उन्हाळ्यामध्ये सर्वांचीच उष्णता शरीरातली वाढायला लागते व ज्यांना मूळव्याध (piles) त्रास आहे त्यांना तर उन्हाळा असहनीय त्रास देऊन जातो. आपल्या शरीरामध्ये जेवढे उष्णतेचे प्रमाण वाढते तेवढा त्रास पचनाला होतो व पचन बिघडले की पोट साफ होण्यास जास्त त्रास होऊ लागतो. पोट साफ होण्यासाठी जेवढा त्रास होईल मुळव्याधाची शक्यता तेवढी जास्त होत जाते. खरे तर उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पातळ पदार्थांवर जोर दिला गेला पाहिजे म्हणजेच जेवणामध्ये कोरडे पदार्थ कमी घेऊन पातळ पदार्थांचे सेवन जास्त केले गेले पाहिजे.
सर्वात मोठा प्रश्न उन्हाळ्यामध्ये लोकांना पडतो तो म्हणजे आंब्यामुळे जास्त उष्णता वाढते का? आंबे तुम्ही कशा पद्धतीने खाता त्यावर शरीराचे उष्णता ठरत असते. घरी आंबे आणल्यानंतर ते पहिले दोन तास किमान पाण्यात पूर्ण भिजतील असे ठेवावे व नंतर त्यांचे ग्रहण करावे. आमरस खाताना त्यामध्ये गाईच्या तुपाची धार हवी जेणेकरून त्यानेही उष्णता होणार नाही.
उन्हाळ्यामध्ये ज्यांना मूळव्याध आहे त्यांनी काय खाणे टाळावे-
- बाजरीची भाकर
- चिकन
- मासे
- भाज्यांमध्ये वांगी बटाटे मेथी हिरवा वाटाणा मोड आलेले कडधान्य
- जास्त मसालेदार पदार्थ
- दही
- लोणचे
- पापड
- रात्रीचे जागरण
काय खावे?
- जास्तीत जास्त फळ भाज्यांचे समावेश ठेवावे जसे भेंडी दोडका भोपळा घोसाळी तोंडली
- कडधान्य हे फक्त भिजून चालते त्याला मोड नको.
- दुपारच्या जेवणानंतर ताकाचा समावेश हवा.
- मोरावळा
- गुलकंद
- वाळ्याचा किंवा कोकम चा सरबत
या सर्व गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये होणारा मुळव्याधाचा त्रास होणार नाही.
About Dr. Nyanisha Desai- Director Of Pradnya Ayurveda
प्रज्ञा आयुर्वेदिक मल्टी स्पेशलिटी अस्पताल (Pradnya Ayurveda Multispecialisty) की निदेशक डॉ. नयनिशा देसाई हैं। 2009 में, उन्होंने आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, पेठ वडगाँव, कोल्हापुर में अपना BAMS पूरा किया। वह 2011 से चिंचवड, पुणे में आयुश्री आयुर्वेदिक क्लिनिक और पंचकर्म केंद्र में अभ्यास कर रही हैं। फिर उन्होंने 2018 में प्रज्ञा आयुर्वेद मल्टीस्पेशलिटी अस्पताल, इंद्रायणी नगर भोसरी की स्थापना की, जिसका उद्देश्य समग्र चिकित्सा के शुद्ध और प्राकृतिक तरीके से रोगियों का इलाज करना था। उन्हें इनफर्टिलिटी और एनोरेक्टल थेरेपी का विशेष अनुभव है।